रयत न्यूजची दखल रस्त्याची डागडुजी सुरू

 रयत न्यूजची दखल रस्त्याची डागडुजी सुरू

ठाणे दि.२३(प्रतिनिधी विशाल कुरकुटे) : कालच रयत न्यूज चॅनलच्या माध्यमातून माळशेज घाटातील रस्त्याची अवस्था आणि त्यावर पडलेले खड्डे या संदर्भात  वृत्त प्रकाशित केले त्याची  दखल घेऊन प्रशासनाने माळशेज घाटातील कल्याण नगर रस्ता यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.या रस्त्यावर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.जागोजागी पडलेले खड्डे पडलेले होते.पावसाळ्यात तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागलेत.रस्ता पूर्ण खड्डेमय झाल्याने नागरिकांना नाहक त्रास होत असल्यामुळे रयत  न्यूज ने वृत्त प्रकाशित केले होते आणि त्याची दखल घेऊन प्रशासनही त्वरित रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे रयत न्यूजचे नागरिकांमधून आभार व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने