यशस्वी क्लासेस संचालकांच्या आईवडिलांचा कृतार्थ पुरस्काराने होणार सन्मान! ♦️नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस

 

यशस्वी क्लासेस संचालकांच्या आईवडिलांचा कृतार्थ पुरस्काराने होणार सन्मान!

 ♦️नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम

नाशिक,दि.२३(प्रतिनिधी) : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीएच्यावतीने, येत्या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, शहर व जिल्ह्यातील जवळपास तीस यशस्वी कोचिंग क्लासेस संचालकांच्या आईवडिलांना " कृतार्थ पुरस्कार " प्रदान करुन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली.  रोटरी हॉल येथे दोन ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन डॉ रविंद्र सपकाळ हे उपस्थित असतील. त्यांच्या हस्ते संघटनेच्या नविन विस्तारीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन होईल.

      यावेळी, माधव जयराम मोरे, लतिका माधव मोरे, ताराबाई यशवंत कदम, सुधाकर यशवंत बुचके, सुचिता सुधाकर बुचके, माधवी मधुकर कोराण्णे, सुनंदा श्रीराम जोशी, नंदकुमार दुसानीस, रंजना नंदकुमार दुसानीस, हेमराज राका, लता हेमराज राका, शिवाजीराव गडाख, सुनीता शिवाजीराव गडाख, मंदा बारकु साबळे, मंगला विश्वास माळी, यमुनाबाई भिमराव अहिरे, लक्ष्मण नामदेव खताळे, पुंजाबाई लक्ष्मण खताळे, गोपाळ सखाराम मोरे, शोभा गोपाळ मोरे, लता राजगुरू, रेखा विसपुते, जयप्रकाश तिवारी, मंजु जयप्रकाश तिवारी, विमल नारायण सुर्यवंशी, चिंधाबाई विठ्ठल राकडे, कमल प्रकाश उबाळे, संजय दामोदर खैरे, अर्चना संजय खैरे, प्रभाकर बाळकृष्ण कदम, सुशिला प्रभाकर कदम, शंकर गणपत पानस्कर, शकुंतला शंकर पानस्कर, प्रकाश रामकृष्ण विसपुते, चंद्रकला प्रकाश विसपुते, अनुराधा भरत रनाळकर, विश्वास यशवंत भट, लक्ष्मण परघरमोल, माधुरी लक्ष्मण परघरमोल, लॉरेन्स ॲन्थोनी सरदार, सीमा प्रकाश सोनार, प्रमिला रामदास विसपुते, अंजना अरुण वाळे, अरुण त्रिंबक वाळे, रंजना किसन साळुंके, कमलबाई अशोक बत्तीसे, महादेव लक्ष्मण खोंपी, रेणुका महादेव खोंपीमुक्ता वसंत बोडके, रघुनाथ नामदेव दिघोळे, सुमन रघुनाथ दिघोळे, संजय भामरे, सुनिता संजय भामरे, प्रमोद सुर्यकांत म्हाळणकर, उषा प्रमोद म्हाळणकर, अलका सुभाष विसरकर, सुषमा रमेश देवरे, हौशीराम पुंजाजी सिरसाट व अलका हौशीराम सिरसाट आदी ज्येष्ठ नागरिकांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी प्रीती देवरे यांची आर्जव ही नाटिका सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने