धावपट्टीवरचा अनोखा प्रवास पुस्तकाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

 धावपट्टीवरचा अनोखा प्रवास पुस्तकाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

गणपूर(ता चोपडा)ता 23: पीएम श्री जिल्हा परिषद शाळा गणपूर येथे वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या उद्देशाने महावाचन प्रकल्पाअंतर्गत राजेंद्र पारे लिखित 'धावपट्टीवरचा अनोखा प्रवास' या पुस्तकाचे वाचन उपशिक्षक शुभांगी भोईटे यांनी केले.त्यावर घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना शाळा व्यवस्थापन समितीतील शिक्षणतज्ञ व साहित्यिक ऍड बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

      स्वतःला परिस्थितीशी झगडत यशस्वी शिखर गाठणाऱ्या बालकाची गोष्ट म्हणजेच 'धावपट्टीवरचा अनोखा' प्रवास ही कादंबरी होय. त्या कादंबरीचे बत्तीस घटकात विभागणी करून परिपाठच्या वेळी दहा मिनिटे वाचन करून त्यावर प्रश्न विचारण्यात आले.व विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.वाचन संस्कृती रुजवत

 त्याची नोंद  वाचन चळवळ रजिस्टरला केली गेली. मिळणारी बक्षिसे पाहून मुलांमध्ये स्पर्धेसाठी चढाओढ निर्माण झाली. ते लक्षपूर्वक श्रवण करू लागले.आणि दिवसागणिक प्रतिसाद वाढू लागला. पूर्ण कादंबरी वाचन झाल्यानंतर  त्यावर आधारित लेखी चाचणीचे नियोजन करण्यात आले. मुक्त वातावरणात चाचणी घेण्यात आली. त्यातून तीन विद्यार्थी  निवडण्यात आले. आणि प्रत्येकाला बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी भोईटे यांनी मानले.ऍड पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.राजेंद्र पारे यांनी आभार मानले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.......

गणपूर(ता चोपडा) बक्षीस वितारांप्रसंगी विजेते,ऍड पाटील,व शिक्षक

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने