कर्जाणाचा अट्टल चोर पोलिस जाळ्यात..६ मोटारसायकली जप्त..गुन्हा अन्वेषण विभागाची धडक कारवाई

 कर्जाणाचा अट्टल चोर पोलिस जाळ्यात..६ मोटारसायकली जप्त..गुन्हा अन्वेषण विभागाची धडक कारवाई . पाचोरा, पारोळा व धुळे येथून चोरल्या होत्या दुचाकी 

चोपडा  दि.९(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी  यांनी विशेष बैठक घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला जोरदार तपास चक्रे फिरविण्याचा आदेश दिल्याने कर्जाणा येथील अट्टल चोर पोलिस जाळ्यात अडकला असून सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड व टीमने मोलाची कामगिरी निभावल्याने जनतेने शाब्बासकीची थाप मारली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकुर  याचे पथक तयार करून गुन्ह्याचा छडा लावण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असतांना पथकातील पोह संदिप पाटील व प्रविण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांच्या  हाती विशेष माहिती मिळाल्यावरून  दिपक सुमाऱ्या बारेला रा. कर्जाणा ता. चोपडा हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याचे समजले त्यानुसार दोन दिवसापासून  हे पथक त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवत आणि त्याची ओळख लपवत वावरत होता. अखेर दिनांक 08/09/2024 रोजी तो  कर्जाणा येथे घरी आला असून  गावातून पळून जाण्याचा प्रयत्नात असतांना नमुद पथकाने कर्जाणा गावाचे बाहेर मेलाणे गावाजवळ त्यास सापळा रचून जाळ्यात अडकविले.त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याचे जवळची युनीकॉर्न मोटार सायकल ही पाचोरा येथून चोरी केल्याचे स्पष्ट केले . अधिक तपासात  त्याने पाचोरा, पारोळा पो.स्टे,मोहाडी ता. जि.धुळे पो.स्टे,तसेच इतर 2 मोटार सायकल धरणगाव व राजपुर जि. बडवाणी येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी दिपक सुमाऱ्या बारेला, वय 29, रा. कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव याचेकडून 6 मोटार सायकल जप्त करून वैद्यकिय तपासणी करून पुढील तपासकामी पाचोरा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने