चोपडा तालुका विद्यार्थी सेना संघटक पदी चेतन पवार यांची नियुक्ती

 

चोपडा तालुका विद्यार्थी सेना संघटक पदी चेतन पवार यांची नियुक्ती

चोपडा दि.९(प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची उत्तर महाराष्ट्र कार्यकारणी  विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्या आदेशान्वये चोपडा संघटकपदी  चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमितजी ठाकरे  त्यांच्या नेतृत्वाखाली मला विद्यार्थी संघटनेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल अमितजी व
विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांचे  आभार मानतो.तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने काम करणार असून यापुढे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शालेय तसेच महाविदयालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी  प्रामाणिक प्रयत्न करेल.तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्रात सर्वात प्रबळ तसेच प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून ओळख व्हावी यासाठी प्रयत्नशील अशी ग्वाही चेतन पवार यांनी दिली आहे.यावेळी विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदिप पांचगे, मनसे जळगांव जिल्हाध्यक्ष अँड जमील देशपांडे,उपजिल्हाधक्ष निलेश बारी,मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश  पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने