लासूर येथे कोट्यवधींच्या विकासकामांच्या श्रीगणेशा

 लासूर येथे कोट्यवधींच्या विकासकामांच्या श्रीगणेशा

चोपडा दि.१५(प्रतिनिधी)तालुक्याचे आ.लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात तालुक्यात विकासकामांची गंगा वाहत आहे.मागील ५ वर्षात हजारो विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण संपन्न झाले असून त्यात रस्ते,पेव्हर ब्लॉक,सामाजिक सभागृह यांच्या समावेश आहे.तालुक्यातील मराठे ग्रामस्थांकरिता मूलभूत प्रश्न असलेल्या लासूर-मराठे-गणपुर रस्त्याचे डांबरीकरण तसेच लासूर गावातील मारुती मंदिर पासून २०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण आदी विकासकामांचे भूमिपूजन आ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते तर माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही असे प्रतिपादन माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

       यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील,महिला आघाडी तालुकाप्रमुख मंगलाताई पाटील,माजी उपसरपंच ए.के.गंभीर सर,कैलास बाविस्कर, मालखेडा सरपंच गणेश पाटील, गलंगी सरपंच शितल देवराज यांसह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने