आ.सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून तावसे बु!! येथे विविध कामे प्रगतीवर....

 आ.सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून तावसे बु!! येथे विविध कामे प्रगतीवर....

   चोपडा दि.०८(प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यात कमालीची भूजल पातळी वाढण्याचा उच्चांक चोपडा तालुक्याने घेतला आहे.गेल्या काळात खालावलेली पाण्याची पातळी तालुक्यावासियांचे डोके दुखीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यावर गांभीर्याने चाणक्य नीतीने दूरदूष्टी  ठेवून माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंवर्धनाची कामे प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात केल्याने भूजल पातळी वाढण्याचे श्रेय सोनवणे दाम्पत्यास जाते. तालुक्यांत उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाई समस्या गंभीर असल्याचे गांभीर्य ओळखून आपला मतदारसंघात पाणी समस्या सुटून परिसर सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी त्यांनी  दंड थोपटले आहेत .

     तावसे बुद्रुक हे गाव तापी नदीच्या काठावर असून सुद्धा पाण्याचे अनेक प्रश्न निर्माण होत होते. याआधी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी   क्षमतेची पाण्याची टाकी आहे व त्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणे कठीण होत असल्याने लोकनियुक्त सरपंच सौ रेखा चौधरी व शिवसेना प्रसिद्ध प्रमुख किशोर चौधरी यांनी पाठपुरावा करून आमदारांकडून दुसऱ्या पाण्याच्या टाकीची मागणी केली व त्यांच्या मागणीला यश मिळवून पुन्हा नवीन दुसऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्ती मध्ये वीस लक्ष रुपयांचे बौद्ध विहाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे याशिवाय अजून तावसे बुद्रुक या गावांमध्ये अनेक विकास कामे केले जातील असे आश्वासन देखील आमदार लता सोनवणे यांनी दिले आहे 

   तावसे बुद्रुक गावात विकास कामांचा झंझावात सूरू असून यासाठी लोकनियुक्त सरपंच सौ रेखा चौधरी , उपसरपंच संदीप दिगंबर पाटील  राजेंद्र देविदास पाटील ( चौधरी ) ,  संदिपनी  संभु कोळी , सौ.अलकाबाई मनोज चौधरी , सौ.सुशिला प्रभाकर शिंदे ,  सौ.बन्सुबाई अनिल पाटील,  धनराज भगवान चौधरी , सौ.बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी , संदीप सुभाष पाटील ( ग्रामसेवक ) सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने