त्या पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनाला आमदार भिडले घरी.. नराधमांच्या फाशीच्या शिक्षेसाठी कुठलीही त्रुटी राहू न देण्याच्या पोलिसांना सुचना

 ..त्या पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनाला आमदार भिडले घरी.. नराधमांच्या फाशीच्या शिक्षेसाठी कुठलीही त्रुटी राहू न देण्याच्या पोलिसांना सुचना

चोपडा दि.९(प्रतिनिधी) आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यातील विरवाडे येथील आदिवासी बालिकेची हत्या प्रकरणातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करुन तीव्र दुःख व्यक्त करीत आरोपी नराधमास फाशीची शिक्षा मिळायलाच हवी यासाठी कोणतीही त्रुटी राहू देता कामा नये अशा सूचना पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिल्या.

 लहानग्या चिमुरडीवर असा घोर अत्याचार झाल्याचे नुसते  कानावर जरी आले तरी अंगावर शहारे येतात मात्र या नराधमाने अत्याचार करून जीवंत ठार करण्याचा अमानुष प्रकार केला आहे त्यास जलद गतीने शिक्षा झालीच पाहिजे अशा तऱ्हेने पाऊल उचलत लवकर फासावर लटकविले गेले पाहिजे असे मतही प्रा.सोनवणे यांनी  व्यक्त केले.याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात,पीआय मधुकर साळवे,ग्रामस्थ व पिडीत कुटुंबिय, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने