पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस पाटील एकनाथ कोळी यांचा सत्कार

 पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस पाटील एकनाथ कोळी यांचा सत्कार 

खडक देवळा ता. पाचोरा (वार्ताहर): दिनांक 28 रोजी पोलीस पाटलांची बैठक पाचोरा पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात  पोळा, गणेशोत्सव, ईद मिलाद हे सण  शांततेत कसे पार पडतील याबद्दल सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी केले सर्व पोलीस पाटलांच्या प्रत्येक गावातल्या अडीअडचणी जाणून घेतल्या

बैठक समाप्तीच्या वेळी खडक देवळा बुद्रुक येथील पोलीस पाटील एकनाथ कोळी यांचा जीव वाचवल्याबद्दल  पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे आभार पोलीस पाटील तुकाराम तेली यांनी मानले.एकनाथ हिरामण कोळी यांचाही शाल श्रीफळ  देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पोलीस पाटील ईश्वर पाटील ,पोलीस उपनिरीक्षक भदाणे ,पोलीस हेड कास्टेबल योगेश पाटील, नितीन पाटील ,भारती बेंडाळे आदी मान्यवरांसह पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने