पुरोगामी चळवळींनी आपले अस्तित्व कायम राखावे : अविनाश पाटील

 पुरोगामी चळवळींनी आपले अस्तित्व कायम राखावे : अविनाश पाटील


जळगाव दि.२८(प्रतिनिधी):- भारतात धार्मिक , जातीय सलोखा कायम राखणे , संविधानाचे संरक्षण करणे , विविध सामाजिक , श्रमिक , आर्थिक प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या पुरोगामी संघटना लोकसभा निवडणुकीपासून इंडिया आघाडी च्या पाठीशी उभी आहे हे जरी खरे असले तरी या पुरोगामी संघटनांनी आपले अस्तित्व कायम राखावे असे आवाहन भारत जोडो अभियान चे उत्तर महाराष्ट्र समन्वयक अविनाश पाटील यांनी केले .

       जळगाव येथील केमिस्ट भवन येथे आयोजित निर्भय बनो , भारत जोडो अभियान , सिव्हील सोसायटी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करतांना पाटील बोलत होते . त्यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की आज महा विकास आघाडीच्या बाजूने जनमत आहे तेंव्हा युतीला हरविणे हाच सिव्हील सोसायटीचा अजेंडा आहे . असे जरी असले तरी आघाडीने एकूण पुरोगामी चळवळीला , दलीत , मुस्लिम यांना सरसकट गृहीत धरू नये . यां घटकांमध्ये जावून त्यांना प्रत्यक्ष काम करावे लागेल . 

      मंचावर  रांजनाताई कान्ह्येरे , खलील देशमुख , जयसिंग वाघ , वासंती दिघे , प्रा. डॉ. शांताराम बडगुजर ई. मान्यवर होते .

          साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की , पुरोगामी चळवळी आज मोठी उदासीन झाली आहे , शेतकरी , शेतमजूर , कामगार , महिला यांच्या चळवळी संपण्यात जमा आहेत.  जे थोड्याफार प्रमाणात चळवळी चालवतात त्यांच्याजवळ पैसा , कार्यकर्ते , कार्यालय वा अन्य साधने नाहीत त्यामुळे त्यांचा आवाज उमटत नाही , कोठे उमटायला लागला तर लागलीच दाबला जातो .

        प्रसिध्द समाजवादी नेते  खलील देशमुख यांनी सांगितले की आज देशात भयाचे वातावरण आहे , वाढती बेरोजगारी , महागाई , खाजगीकरण यामुळे जनता त्रस्त आहे , हे रोकण्या करिता पुरोगामी चळवळी अधिक गतिमान होणे गरजेचे आहे .

    वासंती दिघे यांनी सांगितले की आज महिलांना जगणे खूप अवघड होत आहे , लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहे . राजकारणी लोक आज समाजाभिमुख राहिले नाही .

    रंजनाताई कांन्ह्येरे , प्रा. डॉ. शांताराम बडगुजर यांनीही बैठकीस मार्गदर्शन केले .

   प्रास्ताविक कबीर सोनाळकर यांनी केले . चर्चेत चंद्रकांत साळुंके , फाईम पटेल , राजकुमारी बालदी , सागर साळुंके , समाधान सुरवाडे , सुभाष जाधव  , अरुण दामोदर यांनी भाग घेतला शेवटी सतीश सुर्वे यांनी आभारप्रदर्शन केले . जिल्ह्यातून शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते या बैठकीस आले होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने