रोहितदादा निकम यांची चोपडा जेष्ठ नागरीक संघास सदिच्छा भेट

 रोहितदादा निकम यांची चोपडा जेष्ठ नागरीक संघास सदिच्छा भेट


चोपडा दि.२८(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य सह‌कारी  मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा जळगांव जिल्हा सहकारी दुध फेडरेशनचे संचालक श्री. रोहित दादा निकम यांनी चोपडा जेष्ठ नागरीक संघास सदिच्छा भेट दिली. ज्येष्ठ  नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. जयदेव देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी त्यांनी ज्येष्ठ  नागरीक संघाची इमारत व सभागृहाची पाहणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या संघाच्या कामकाजाची आत्मियतेने माहिती घेतली . तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करुन संस्थेच्या उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री जिजाबाराव नेरपगारे, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील, सहसचिव अभि. विलास एस.पाटील, कार्यकारणी सदस्य श्री.श्यामभाई गुजराथी, श्री. गोकुळ पाटील , श्री. परशुराम पेंढारकर, श्री. सुभाष गुरुजी पाटील, श्री. शांताराम पाटील, श्री.भैय्यासाहेब बाविस्कर,  श्री. रितेश दादा निकम,अमर दादा, चंद्रशेखर पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने