भुसावळ शहर कॉंग्रेस कमेटी व अल्प संख्याक विभागातर्फे निषेध.. राज्यपाल व प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन

 

भुसावळ शहर कॉंग्रेस कमेटी व अल्प संख्याक विभागातर्फे निषेध.. राज्यपाल व प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन

भुसावळ दि.२८(प्रतिनिधी)भुसावळ शहर कॉंग्रेस कमेटी व  अल्प संख्याक विभागातर्फे मालवण येथे छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्याने महाराष्ट्राचा अवमान झाला असून   मोठ्या  प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही नामुष्की ओढवली आहे तरी संबंधित ठेकेदार, मंत्री व अधिकारी यांना जबाबदार धरून कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे राज्यपाल व भुसावळ प्रांताधिकारी यांचेकडे केली आहे.
यावेळी भुसावल शहर कॉग्रेस कमेटी अध्यक्ष रवींद्र निकंम, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान, अल्पसंख्यॉक शहर अध्यक्ष सलीम गवळी, महिला शहर अध्यक्ष यास्मीन बानो,असगर भाई,सागर वानखेड़े, सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, अनवर तडवी,अमीन तडवी जफर पिजारी व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने