मितावली व तांदलवाडी जि.प.शाळेत वह्या वाटप


मितावली व तांदलवाडी जि.प.शाळेत वह्या वाटप


चोपडा दि.१९(प्रतिनिधी) ग्राम विकास मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन व केंद्रीय क्रीडा,युवक कल्याण मंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे अनुसूचित जमाती विभाग जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर (सर) यांच्या माध्यमातून मिताली व तांदुळवाडी  जि.प.शाळेत गरीब गरजवंत विद्यार्थिनींना वह्या वाटप करून मोलाचा हात दिला आहे.
तांदलवाडी जि.प.शाळेत चोपडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोपाळ धनगर यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी नंदलाल धनगर, गजानन शेलार हे उपस्थित होते.तर मितावली जि.प.शाळेतही भाजप कार्यकर्ते गणेश प्रताप पाटील यांच्या हस्ते ११० वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने