आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्य सम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा विधानसभा मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६.४० कोटींचे रस्ता कामे मंजूर

 आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्य सम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा विधानसभा मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६.४० कोटींचे रस्ता कामे मंजूर 

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदारसंघातील धडाकेबाज आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या अथक  परिश्रमाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत  रस्ते विकास मजबुतीकरण करण्यासाठी  सन २०२४-२०२५करीता   जवळपास 11 रस्ते कामांचे नशीब  उघडले असून ६ कोटी ४०लाख ७७हजार  रुपयांच्या निधी मंजूर  झाला आहे.लवकरच या कामांचा श्रीगणेशा होणार आहे.ऐन गणेश विराजमानाच्या शुभ पर्वावर या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली म्हणून आमदारद्वयींच्या या कार्यावर  मतदारसंघातील जनता जाम खुश झाली आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत असल्याने विरोधकांनी  खोटा कांगावा करत अप प्रचार करण्याचा प्रयत्न चालविला असून जनता बोळ्याने दुध पिण्या एव्हढी खुळी राहिलेली नाही असा टोला विकसनशील भागातील रहिवाशांनी लगावला आहे

 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नुकतीच मंजूर झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे अ.क्र.कामाचे नाव व कंसात मंजूर निधीचा आकडा 1)यावल तालुक्यातील सावखेडा सिम साकळी रस्ता  मजबूतीकरण व डांबरीकरण करणे चाळीस लाख २)चोपडा तालुक्यातील धुपे खुर्द नवीन गावठाण रस्ता ते धुपे बुद्रुक रस्ता  मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व  मोरी बांधकाम करणे शंभर लाख ३) धुपे बुद्रुक ते भारडू रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 35. 77 लाख ४)चोपडा ते तावसे बुद्रुक रस्ता  मजबुतीकरण व डांबीकरण करणे व मोरी बांधकाम करणे पन्नास लाख ५)घुमावाल बुद्रुक ते रामा ४० रस्ता  मजबुतीकरण व डांबीकरण करणे 50 लाख ६)यावल तालुक्यातील रामा-०४  ते गायरान रस्ता चुंचाळे गायरान रस्ता  मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख ७)यावल तालुक्यातील डांभुर्णी ते दगडी रस्ता जलनिस्सारणाच्या कामासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 55 लाख 8)खर्डी ते लोणी रस्ता  तसेच कमळगाव ते पारगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व मोरी बांधकाम करणे एक कोटी ९)निमगव्हाण ते खाचणे  रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख १०)रुखणखेडा ते तावसा रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे 70 लाख  ११)यावल तालुक्यातील कासारखेडा ते किनगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 60 लाख रुपये

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने