चोपड्यात आम आदमी पार्टी तर्फे जाहीर निषेध

 चोपड्यात आम आदमी पार्टी तर्फे  जाहीर निषेध

चोपडा,दि.२७(प्रतिनिधी)राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने आम आदमी पार्टी चोपडा शाखेतर्फे या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे 

 दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. तो पुतळा अवघ्या आठ महिन्यांत काल दिनांक २६/०८/२०२४ रोजी  पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा बसवण्यापूर्वी शिवप्रेमींनी आवाज उठवून पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास धरून नसल्याचे कळवले होते. परंतु सदर सूचनांकडे दुर्लक्ष करून सदर शिवस्मारकाचे घाई घाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सदरच्या शिव स्मारकासाठी महाराष्ट्रातील जनतेचे अडीच कोटी रुपये खर्चुन जयदीप आपटे या अल्पअनुभवी कारागिराला काम दिले गेले. विद्यमान सरकारने फक्त प्रसिद्धीसाठी देशातील कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना आज दुखावल्या आहेत. त्यामुळे आज चोपडा तालुका आम आदमी पार्टी तर्फे सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.तसेच सदर दुर्दैवी घटनेला जबाबदार भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व मंत्र्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.

 यावेळी जिल्हा महासचिव  विठ्ठलराव साळुंखे तालुकाध्यक्ष समाधान भिमराव बाविस्कर  युवा नेते बाबु कोळी ,तालुका सचिव भिमराव अर्जुन उमाळे ,अशोक रतन ढालवाले ,बळीराम परशुराम बारेला मयाराम दिलदार बोरेला , सुनिल रमेश बोरला ,छोटू रमेश सोनवणे,विजय दशरथ शेलकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने