साने गुरुजी नगरातील ओपन स्पेस मधील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवा ..!अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा सुज्ञ नागरिकांचा इशारा

 साने गुरुजी नगरातील ओपन स्पेस मधील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवा ..!अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा सुज्ञ नागरिकांचा इशारा 

 सानेगुरुजी नगरातील हाच तो ओपन स्पेस 🖕

चोपडा,दि.२०(प्रतिनिधी):नगर पालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेस जागेवर अतिक्रमण करीत हक्क मिळवू पाहणाऱ्यांना वेळीच लगाम लावून कारवाई करावी अन त्या जागेवर विविध समाजोपयोगी कामे करून जनहित जोपासावे अशी मागणी साने गुरूजी नगरातील सुज्ञ रहिवासींनी केली आहे.

हया ओपन स्पेस जागेचे शासकीय  मोजमाप करून अतिक्रमित केलेल्या भागाचे अतिक्रमण काढून जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून जवळपास २३रहिवाशांनी केली आहे .मात्र न.पा. या तक्रार अर्जावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.वास्तविक पाहता न.पा.मालकी हक्काची जागा असल्याने पालिकेने त्या जागेचे संरक्षण करणे गरजेचे असल्यावरही  सुज्ञ नागरिकांना पुढे यावे लागत असल्याने अचंबा व्यक्त करण्यात येत आहे. न.पा.चे दूर्लक्ष करण्या मागील गौडबंगाल काय?असा संतप्त सवाल परिसरातून व्यक्त केला जात आहे. 

 शहरातील साने गुरुजी नगर भागात असलेल्या नगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेस (खुल्या जागेत) गट नंबर १०६५ वरील जागेत लगतच्या काही रहिवास्यांनी अनाधिकृत अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण हटवून ओपन स्पेस मध्ये सजावटीकरण, वृक्ष लागवड इत्यादी होणे करिता कॉलनीच्या जागरूक रहिवाशांनी तक्रार वजा मागणी केली आहे. या निवेदनास सुमारे सहा ते सात महिने  होऊन गेले आहेत तरीही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही  ठोस निर्णय न घेता अतिक्रमण हटविण्याकरिता  पाऊल का उचलले नाही याबाबत  रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तरी सदर  अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण काढून नपा.मालकिची जागा ताब्यात घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रहिवासींनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने