उद्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १ दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप!

 

उद्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १ दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप!

चोपडा,दि.२०(प्रतिनिधी): उद्या दिनांक २१ ऑगस्ट रोजी, सकाळी १० ते  मुख्यमंत्र्यांची भेट होई पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रचंड निदर्शन केली जाणार आहेत ..  सरकारचा निषेध म्हणून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या पत्रकात म्हटलेले आहे
गेल्या १६ जानेवारी २०२४ रोजी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ, दरमहा पेंशन व ग्रेच्यूईटी देण्यासंबंधी, मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या  आश्वासनाची पूर्तता केली नाही. म्हणून हे आंदोलन छेडण्यात येत आहे
तरी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी  उद्या एक दिवसाचा काम बंद आंदोलन करून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक चे सरचिटणीस कॉम्रेड अमृत महाजन ममता महाजन वत्सला पाटील रंजना मराठे ,अश्विनी देशमुख सुनंदा पाटील ,देवेश्री बाविस्कर, प्रतिभा पाटील,कविता सोनवणे उषा पाटील हिरा पाटील ज्योती पाटील जयश्री लध्धे ,लता पाटील,कोकिळा माळी, शारदा  पाटील विजया पाटील मंगला कोळी ,हिराबाई मली मंगला बरेला प्यारी बारेला वैशाली पाटील मिनॉक्सी काटोले अनिता सावळे आदींनी केले आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने