भारतीय जैन संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिनी मूकबधिर विद्यालयात कपडे व खाऊ वाटप

 भारतीय जैन संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिनी मूकबधिर विद्यालयात कपडे व खाऊ वाटप

चोपडा दि.२०(प्रतिनिधी):भारतीय जैन संघटना चोपडा शाखेतर्फे  स्वातंत्र्यदिनी व बीजेएस चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांचे जन्म दिवसाचे औचित्य साधून स्व. तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ संचलित मूकबधिर विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांना रेडीमेड कपडे व खाऊ वाटप कार्यक्रम माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोथरा व माजी जिल्हा सचिव दीपक राखेचा यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर, कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा ,सल्लागार दर्शन देशलहरा हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यकर्ते आकाश जैन, वृषभ कोचर, संस्कार जैन, मनन जैन, पार्थ बरडिया,प्रेम चोपडा, समय चोपडा यांनी परिश्रम घेतले.मूकबधिर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका नम्रता धनगर, शिक्षिका वैशाली पाकळे व उमेश धनगर यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने