बालिका विनयभंग प्रकरणी दोघांवर कडक कारवाई करा..आदिवासी संघटनेची मागणी

 बालिका विनयभंग प्रकरणी दोघांवर कडक कारवाई करा..आदिवासी संघटनेची मागणी 

चोपडा दि.२१(प्रतिनिधी)चोपडा शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या आदिवासी कुटुंबातील बालिकेचा विनयभंग करणाऱ्या दोघांवर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. अन्यथा सर्व आदिवासी संघटना रस्त्यावर  उतरतील असा इशाराही देण्यात आला आहे

दि.12/08/2024 रोजी चोपडा येथील सलमान खान व अख्तर खान (वय 28 रा.चोपडा) नामक व्यक्तींनी आदिवासी परिवारातील  उदरनिर्वाहासाठी आलेल्या  कुटुंबातील दहा वर्षीय मुलीवर घरात घुसून विनयभंग केला या आरोपींवर बालकांचे लैंगिक शोषण व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी  अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनप्रसंगी कर्जाने सरपंच सतीश बारेला , अंबाडाचे सरपंच सुनील भिल , माजी सभापती रामचंद्र भादले, ज्ञानेश्वर एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष आबा नामदेव भील, एटीएस संघटनेचे तालुका अध्यक्ष नामा पावरा, रवि बारेला, दिपक भोसले, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने