खासदार संजय राऊत यांचे जळगावची जोरदार स्वागत


खासदार संजय राऊत यांचे जळगावची जोरदार स्वागत 

 जळगाव दि.२१(प्रतिनिधी )आज दि.21/08/2024 रोजी शिवसेना नेते राज्यसभेचे खासदार महाराष्ट्राची रोखठोक बुलंद तोफ  संजयजी राऊत हे जळगांव जिल्हा दौऱ्यावर आले असता  शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात त्यांचे आगमन  होताच मोठ्या जल्लोषात ढोल ताशांचा गजरात पुष्पवृष्टी करण्यात येऊन जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी उपजिल्हा प्रमुख विधीसेवा तथा  झिपरु अण्णा विद्यालयाचे अध्यक्ष ॲड.नेमचंद  मोतीलाल येवले, शाळेचे सचिव श्री मोतीलाल येवले, कुणाल खडके, शाळेचे शिक्षकवृंद, कैलास पाटील, उज्वल पाटील यांनी सत्कार करुन स्वागत केले.

 प्रसंगी सुप्रीम कॉलनीतील शहारुख पटेल, अभिषेक चव्हाण, परेश बडगुजर, निलेश मिसाळ, बाळु नाले, विष्णू पाटील,अजय जाधव, तसेच नशिराबाद शहरातील शे.कलीम मोमीन, मो.एजाज मो.अखतर, शे.मुसताक शे.हुसैन, शे.आबीद शे.हसन आदि. शिवसैनिक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने