चौगावच्या हर्षित पालिवालची जिल्हा बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड

 चौगावच्या हर्षित पालिवालची जिल्हा बुद्धीबळ  स्पर्धेसाठी निवड

चोपडा दि.२६(प्रतिनिधी) :येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळांतर्गत जिल्हा बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवडीसाठी  तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात होती.त्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला . यात सतरा वर्षा आतील गटात चौगाव येथील डाँक्टर कैलास पालिवाल यांचा मुलगा हर्षित कैलास पालिवाल याने तालुकास्तरीय बुद्धीबळ क्रिडा स्पर्धेत आपल्या आँक्सफर्ड विद्यालयातून दणदणीत विजय मिळवला असून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निवड झालेल्या हर्षितला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैयासाहेब अँडव्होकेट संदिप सुरेश पाटिल,महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डाँ.स्मिता संदिप पाटिल,प्राचार्य  सौ.ममता न्याती मँडम व शिक्षक वृंदांनी शुभेच्छा दिल्या.चि.हर्षित पालिवाल यास क्रिडा शिक्षक   भुषण गुजर सर व राजश्री कुंटे मँडम तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.

 चि.हर्षिकच्या जिल्हास्तरीय निवडी बद्दल त्याचे चौगाव आणि परीसरातून कौतूक गेले गेले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने