देशात वनौषधी "मोह वृक्ष" फळझाडांप्रमाणे बंधन मुक्त व्हावा केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शेतकऱ्यांची मागणी

 

 देशात वनौषधी  "मोह वृक्ष" फळझाडांप्रमाणे बंधन मुक्त व्हावा केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शेतकऱ्यांची मागणी

  ♦️जळगावात शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मंत्र्यांकडे मांडल्या व्यथा 

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)वन औषधीयुक्त देशाची भौगोलिक मक्तेदारी असलेला कल्पतरू "मोह" वृक्षास फलोत्पादन म्हणून राज्य मान्यता मिळावी अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री  शिवराजसिंह चौहान यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात केली.

जळगाव जिल्ह्यात लखपती दीदी कार्यक्रमा निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेऊन शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात राहुरी विद्यापीठात अंतर्गत केव्हीके पाल व जळगाव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.यावेळी कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा करून त्या संदर्भीय लेखी निवेदनांचा स्वीकार करून मागण्यांचे केंद्र सरकार जरूर निरसन करेल असे आश्वासन दिले.

यावेळी शेतकऱ्यांनी मोहवृक्षास फलोत्पादन म्हणून राज मान्यता मिळावी तसेच महाराष्ट्र राज्य वन विभाग स्थापित विकास खारगे समितीप्रमाणे केंद्रस्थानी शेतकऱ्यांची मोह वृक्ष संगोपन संवर्धन व मूल्यवर्धनार्थ समिती स्थापन करावी, हा वृक्ष प्राचीनकाली आयुर्वेदातील महत्त्व संदर्भात चर्चा होऊन मोहसंवर्धनात व मूल्यवर्धन संदर्भात या वृक्षाच्या उपयुक्ततेनुसार या झाडाचा फलोत्पादनात  समावेश व्हावा ,आयुष मंडळाचे लाभ मिळावेत, प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन पणन विपणनासाठी परवानामुक्त करावा, उपघटक विकासासाठी ग्रामीण रोजगार कार्यक्रमाची नियोजन व्हावे,झाडांचे तांत्रिक संशोधन होऊन जागतिक स्तरावर व देशांतर्गत आयात निर्यात धोरण इतर फळाप्रमाणे शिथिल करावे,देशातील सर्व राज्यांच्या मोहवृक्षांच्या उपघटकांसाठीचे नियमात राज्यांचा समन्वय असावा,विशेष वृक्ष विकास योजना कृषी विभागाकडून अंमलबजावणी व्हावी, हा दीर्घायुषी वृक्ष 80 ते 100 वर्ष टिकणारा असल्याने याला फळबागांप्रमाणे विमा संरक्षण देऊन कार्बन क्रेडिटचा लाभ मिळावा आदी मागण्या मांडण्यात आल्या यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांनी शेतकरी बी .जी. महाजन यांचे मोहवृक्ष फलोत्पादन प्रयोगाचे कौतुक केले.

 देशातील पहिला नाविन्यपूर्ण (इनोव्हेटिव्ह) मोहवृक्ष पथदर्शक प्रकल्प 2007 पासून 12 एकर क्षेत्रात 900 मोह रोपांच्या लागवडीतून पाच प्रजाती  शेतकरी श्री बीजी महाजन चुंचाळे ता.चोपडा जि जळगाव यांनी संवर्धित केलेले आहेत . त्यांनी मोह वृक्षाचे विकासात्मक संशोधन ,संवर्धन व मूल्यवर्धनार्थ प्रायोगिक तत्त्वावरील मोहवृक्षा पासूनच्या उपघटकांपासून विविध प्रक्रिया उद्योग माध्यमातून टोळंबीचे वनस्पती तूप,कल्प,सिरप,फुलांचे लाडू,टसल रेशीम,फुलांचा अर्क,मध,मोहाच्या रोपांवर कलमीकरण पद्धतीने विकसित केलेले आहे.वेगवेगळे वर्गीकरणानुसार पाच प्रजातींचे संवर्धन केलेले रोपांच्या स्टॉलला कृषिमंत्री यांनी भेट दिली त्यानंतर त्यांनी संशोधनात्मक संग्रहित केलेले माहिती संकलित पुस्तक "मोहवृक्ष एक कल्पतरू" चे अनावरण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते होऊन त्यांना मोह वृक्ष फळे व फुलांपासून प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा नमुनासंच व "मोहवृक्ष एक कल्पतरू" हे पुस्तक भेट देण्यात आले. 

याप्रसंगी भूमिपुत्र समूहाचे संचालक गुरज्या बारेला,वैद्य रवींद्रनाथ पाटील,भिकन बनसोडे, चोपडा विठ्ठलचेआप्फ्रो सदस्य डॉ.रवींद्र निकम,अंबादास पाटील,कृषि विद्यापीठ तज्ञसल्लागार संचालक सदस्य पोलीस पाटील नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी सन्मानार्थि संघटनेचे अध्यक्षअँड.प्रकाश पाटील तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधव,कृषी विज्ञान केंद्र जळगाव व पाल येथील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.  सूत्रसंचलन वरिष्ठ शास्त्रज्ञ जाधव यांनी तर  आभार तुषार गोरे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने