हनुमंत पाडा, चहार्डी येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 हनुमंत पाडा, चहार्डी येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


चोपडा दि.१२(प्रतिनिधी)- शालेय शिस्तीचा एक आवश्यक भाग वर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची भावना रुजावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आवश्यक असतो. परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने काही पालक हे गणवेश आपल्या पाल्यांना उपलब्ध करून देऊ शकत नाही. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन चोपडा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा येथील मिलाप स्टोअर्सचे मालक नितीन जैन यांच्या सौजन्याने चहाडी येथील शाशी पाटील माध्यमिक विद्यालयात इ. ५ वी ते १० वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. चोपडा रोटरी क्लबतर्फे रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी चहार्डी येथील खदान वस्ती परिसरातील हनुमान पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सरपंच चंद्रकला ताई,  क्लब अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव बी. एस. पवार, सहसचिव संजय बारी, प्रकल्प प्रमुख गौरव महाले,  सह प्रकल्पप्रमुख अनुराग चौधरी, डिस्ट्रिक्ट जॉईंट सेक्रेटरी नितीन अहिरराव, सदस्य विलास पी पाटील, चंद्रशेखर साखरे, नंदकिशोर पाटील, चोसाका संचालक निलेश पाटील, चहार्डी येथील शा. शि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. सोनवणे, आर सी सी क्लबचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांच्यासह पाड्यावरील नागरिक उपस्थित होते. यावेळी सरपंच ताईसाहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी रोटरी क्लबच्या या मदतीचा उपयोग करुन मोठे यश प्राप्त करावे असे सांगितले. तर डॉ. सौंदाणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रोटरीच्या सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन भूषण भाऊ यांनी तर आभारप्रदर्शन व्ही. आर. सोनवणे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने