त्या वनक्षेत्रपाल विरूद्ध तक्रारींचे अवलोकन करून नियमोचित अहवाल पाठविण्याचे आदेश

 त्या वनक्षेत्रपाल विरूद्ध तक्रारींचे अवलोकन करून नियमोचित  अहवाल पाठविण्याचे आदेश 

चोपडा दि.१२(प्रतिनिधी)जनहित माहिती अधिकारी तथा  यावल सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल कैलास अहिरे  यांना  पुणे मुख्य वनसंरक्षक यांनी माहिती देण्याचे आदेश दिले होते.त्या आदेशाला त्यांनी  केराची टोपली दाखवली आहे अशी माहिती समोर आल्याने  त्यांच्यावर  शिस्तभंगाची दंडात्मक कारवाई करावी अशी तक्रार भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी केली आहे.

  दि. २४/०६/२०२४ रोजी गायकवाड यांनी केलेला ईमेल प्राप्त झाला असून तरी सदरचा ई-मेल हा  विभागाशी संबंधित असल्याने ई-मेल मधील नमूद मुदयांचे अवलोकन करुन त्यानुसार नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कारवाईबाबत अहवाल पाठवावा असे  पत्र  वनसंरक्षक नाशिक सामाजिक वनीकरण विभागाला  सामान्य प्रशासन विभाग तहसीलदार पल्लवी जगताप यांनी काढले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने