गणपूर येथे गोकुळाष्टमी ची धूम पाच हजार भाविकांनी घेतले दर्शन

 गणपूर येथे गोकुळाष्टमीची धूम पाच हजार भाविकांनी घेतले दर्शन 


गणपूर (ता चोपडा) मंडपात आरास करून ठेवण्यात आलेल्या विशेष मुर्त्या

गणपूर (ता चोपडा )ता 26 :येथे आज मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला.महानुभाव पंथीयांनी गावात दहा ठिकाणी मंडप उभारून पंन्नी पताकासह रोषणाई करण्यात आली हाती व त्यात विशेष ची स्थापना करण्यात आली होती.गावभर पण पताका बांधून लाइटिंग करण्यात आली होती. दिवसभर व रात्री बारा वाजेपर्यंत सुमारे पाच हजार भाविकांनी  आरास केलेल्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या विशेष व मूर्तींचे दर्शन घेऊन पाळण्याचे दर्शन घेतले. रात्री बारा वाजता  कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी आरती आणि कृष्णाचा पाळणा म्हणण्यात आला. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठी आतशबाजी ही करण्यात आली. त्यावेळी गावातील भाविकांसह बाहेर गावाहून आलेले नातेवाईक व भाविक भक्तांसह मानता मानणाऱ्या भाविकांनी दर्शन घेऊन आनंद सोहळा उत्साहात पार पाडला.. .......


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने