चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून १०८ कोटींचा निधी मंजूर

चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून १०८ कोटींचा  निधी मंजूर

चोपडा दि.१(प्रतिनिधी) : नुकताच महाराष्ट्र राज्याचा आर्थिक बजेट घोषित झाला. सामान्य जनतेसाठी महायुतीच्या सरकारने अनेक लोक विकास कामे,योजना अंमलात आणल्या आहेत.यांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आलेली असून चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून जवळपास १०८ कोटींची कामे मंजूर झाली आहेत.
     या कामांमध्ये  आदिवासी आश्रमशाळा व मुलींचे वसतिगृह साठी (43.5 कोटी),आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी (50 कोटीं)सार्वजनिक बांधकाम विभाग कडून रस्ते(15 कोटीं) ,वैजापूर ता.चोपडा येथे शासकीय आश्रमशाळा शालेय इमारतीचे बांधकाम करणे. (१४. ५० लक्ष), कृष्णापुर ता. चोपडा येथे शासकीय आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम करणे. (१४. ५० कोटी),चोपडा शहरात शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह इमारतीचे बांधकाम करणे (१४. ५० कोटी)असा एकूण 108 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे
       चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या भरघोस निधी साठी तसेच पालकमंत्री ना. श्री‌. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. श्री. गिरीश महाजन,व मदत व पुनर्वसन मंत्री  ना. श्री. अनिल पाटील यांचे आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने