बी.आर.एस.च्या कोमल ताई पाटील यांच्या प्रयत्नाने सनपुलेच्या १० महिलांना शिलाई मशीन वाटप

 बी.आर.एस.च्या कोमल ताई पाटील यांच्या प्रयत्नाने सनपुलेच्या १० महिलांना शिलाई मशीन वाटप

चोपडा दि.१(प्रतिनिधी)भारत राष्ट्र समिती पक्षाचे चोपडा विधान  सभा प्रमुख  समाधान बाविस्कर तसेच जळगाव जिल्हा महीला आघाडीचे सौ. कोमलताई पाटील व  चोपडा तालुका महीला आघाडीच्या अनिता जाधव याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आज दिनाक 1ऑगस्ट रोजी सनपुले गावी 10  गरजु  महिलांना रोजगार मिळावा म्हणून अल्प दरात शिलाई मशिन वाटप करण्यात आले.

यावेळी शोभाबाई विजय निकाळजे, कविता प्रकाश कोळी,शारदा सोपान कोळी,सुरेखा बाबुराव बाविस्कर, राजुबाई नाना मोरे, हर्षा अक्षय कोळी , प्राजक्ता किरण पाटील,मथुरा बाई नवल पाटील, संगिताबाई समाधान पाटील असे दहा महिलांना  या महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आले.यावेळी महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने