आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत फडकला प्रतापचा झेंडा

 आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत फडकला प्रतापचा झेंडा

चोपडा दि.१(प्रतिनिधी):रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील ४४ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातील सर्व राज्य तसेच रशिया, टानजानिया, भूतान ,कुवेत, मलेशिया, दुबई, बेल्जियम, कतार ,मालदीव, यांसारख्या विविध देशांनी सहभाग घेतला होता.  स्पर्धेमध्ये प्रताप विद्या मंदिर ८००  राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला त्यात १०१ विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आले,  तर (इयत्ता १ली ते १२वी) ४४ विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला व सर्व विद्यार्थी या स्पर्धेत यशस्वी झालेत. या स्पर्धेत कु. गौतमी गीते(११वी),अथर्व तुषार लोहार (७ वी), खुशी पंकज नागपुरे(८वी), कु अविका कमलेश गायकवाड (४थी), यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना मेडल व पारितोषिकांनी गौरविण्यात आले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव माननीय माधुरीताई मयूर, प्रमुख अतिथी म्हणून  श्री.ए.पी.पाटील सर (सेवानिवृत्त कलाशिक्षक), श्री राजेंद्र महाजन (सेवानिवृत्त प्राचार्य), चोपडा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, श्री.वसंत नागपुरे( पर्यवेक्षक- सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव) तसेच माननीय मुख्याध्यापक  श्री .प्रशांत गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री. पी.डी.पाटील उपप्राचार्य श्री.जे.एस.शेलार, पर्यवेक्षक  श्रीमती माधुरी पाटील, श्री.एस.एस.पाटील, श्री.ए.एन.भट, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली तसेच उत्कृष्ट कार्य आणि सहकार्याबद्दल शाळेला ग्लोबल स्कूल अवार्ड, अनमोल सहकार्याबद्दल संस्थेच्या ट्रस्टींना ग्लोबल आर्ट कल्चर अवॉर्ड ,मुख्याध्यापक श्री. प्रशांत गुजराथी यांना  वर्ल्ड वाईड हायेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड,  कलाशिक्षक व रंगोत्सव सेलिब्रेशनचे इव्हेंट डायरेक्टर श्री.पंकज नागपुरे यांना द सलवादोर दाली पुरस्काराने गौरवित करण्यात आले. तर कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांची रंगोत्सव सेलिब्रेशन इव्हेंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती बद्दल सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन श्री. राजाभाई मयूर, संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर श्री.चंद्रहास गुजराथी, श्री.भूपेंद्र गुजराथी,  संस्था समन्वयक श्री.गोविंद गुजराथी तसेच सर्व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन नियोजन व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  कलाशिक्षक श्री .पंकज नागपुरे व कलाशिक्षक श्री .कमलेश गायकवाड सरांनी मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता तर पालकांमध्येही आनंदाचे, समाधानाचे वातावरण होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एल. बी. पाटील, श्री. पी. एन.पाटील सर यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक श्री. पी.डी.पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक श्री.पंकज नागपुरे, कलाशिक्षक श्री .कमलेश गायकवाड, संगीत शिक्षक श्री.पी.बी.कोळी यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व विद्यार्थी व पालकांना अल्पोहार व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने