भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे कमला नेहरू मुलींचे वसतिगृहात वह्या वाटप

 

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे कमला नेहरू मुलींचे वसतिगृहात वह्या वाटप

चोपडा दि.१९(प्रतिनिधी) ग्राम विकास मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन व केंद्रीय क्रीडा,युवक कल्याण मंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे अनुसूचित जमाती विभाग जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर (सर) यांच्या माध्यमातून कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील गरीब गरजवंत विद्यार्थिनींना वह्या वाटप करून मोलाचा हात देण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यातील  आदिवासी पाड्या वस्तीं व जि.प.शाळांमधील ३० हजार अनुसूचित जमातीच्या गोर गरीब विद्यार्थ्यांना वह्या  वाटपाचा वाटा उचलण्यात आला आहे त्याचा भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडला.

९ ऑगस्ट जागतिक क्रांतीदिवस व आदिवाशी दिवसाचे औचित्य  साधत हा स्तूत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाटील, रविंद्र मराठे,दीपक बाविस्कर, वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, अधिक्षिका कावेरी कोळी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने