जुन्या आठवणी ताज्या करणारे समाज माध्यम म्हणजे फोटोग्राफी : माजी आमदार कैलासबापू पाटील

 जुन्या आठवणी ताज्या करणारे समाज माध्यम म्हणजे फोटोग्राफी : माजी आमदार कैलासबापू पाटील


 चोपडा( प्रतिनिधी ) जुन्या आठवणी ताज्या करून देणारे समाज माध्यम म्हणून फोटोग्राफी फार महत्त्वाचे साधन आहे. फोटोग्राफरला काय दिसलं पाहिजे, अन काय दिसायला नको, त्यासाठी फोटोग्राफर बांधवांनी संघटित राहील पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार व सूतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील यांनी येथे केले.

 चोपडा शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या, ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आज तारीख 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. व्यासपीठावर, तापी सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन, प्रल्हाद पाटील, माजी संचालक तुकाराम पाटील, माजी जि. प.सदस्य शांताराम सपकाळे, सामाजिक कार्यकर्त्या, सौ ज्योती सुनील पावरा, ग्रामीण पोस्टेच्या - पी आय. कावेरी कमलाकर, शिवम आयुर्वेदिक संचालक शशिकांत एम पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जिजाबराव नेरपगारे, ज्येष्ठ,, शशिकांत सोमा जाधव इंजिनिअर, ज्येष्ठ फोटोग्राफर भरत भाऊ राजपूत आदी मान्यवर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जे. पाटील यांनी केले. यावेळी कावेरी कमलाकर जीवन,भाऊ चौधरी, शशिकांत पाटील नेरपगार आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमात आगामी वर्षभरात शेतकरी फोटोग्राफर बांधवांसाठी व पत्रकारांसाठी एक फोटोग्राफर व एक पत्रकार  यांना पारितोषिक देण्याचे घोषित करण्यात आले. प्राध्यापक संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सुशांक डिजिटल संचालक छोटू भाऊ वाडे खोखर क्रिएशनचे संचालक अजहर तेली,सागर सोनवणे, सचिन बडगुजर,    रईस शेख, योगेश राजपूत, सागर महाजन राजेंद्र धनगर, योगेश बैरागी विनोद मोरे अनेक मूव्हीचे संचालक, तालुक्यातून आलेले सगळे फोटोग्राफर, फोटो व्यवसायात काम करणारे कामगार व कलाकारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. कॅमेरा या निवडणूक चिन्हावर  निवडून आलेले, गणपुर येथील युवा कार्यकर्ते श्री योगेश भिल यांना यावेळी गौरवण्यात आले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने