रोटरी आणि समाजकार्य महाविद्यालय बनणार वृद्धांची 'काठी'; संयुक्त उपक्रमाचा शुभारंभ

  रोटरी आणि समाजकार्य महाविद्यालय बनणार वृद्धांची 'काठी';  संयुक्त उपक्रमाचा शुभारंभ

चोपडादि.३१(प्रतिनिधी) - येथील रोटरी क्लब व समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने दि. ३१ रोजी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात एका अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

          जीवन जगत असतांना आपल्या जीवनात आनंदाचे व दुःखाचे क्षण अनुभवत आपल्या  मुलाबाळांना चांगले दिवस यावेत यासाठी माणूस नेहमी धडपड करत असतो. आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आपल्यापासून दूर पाठवून ज्येष्ठ मंडळी त्यांच्या उतारवयात जीवन जगत असतात. परंतु वयानुसार ते थकतात व आपली विविध शासकीय कार्यालयातील कामे करताना बऱ्याच वेळेस त्यांना अडचणी येतात. त्यांच्या या समस्या लक्षात घेऊन त्यांना मदतीसाठी एक हात म्हणून रोटरी क्लब ऑफ चोपडा व समाजकार्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या 'ज्येष्ठ नागरिक सहाय्यक' या उपक्रमा अंतर्गत समाजकार्य महाविद्यालयाचे पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांतर्गत हे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. या सुविधेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी केले

         या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. मोहिनी उपासनी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावर उपाय या विषयावर समुपदेशन केले. तसेच जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांना दर बुधवार व गुरुवारी समुपदेशन करण्यासाठी आपण उपलब्ध राहू असा शब्दही दिला. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख धिरेंद्र जैन, उपप्रमुख डॉ. वैभव पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत देशमुख, उपाध्यक्ष जिजाबराव नेरपगारे हे मंचावर उपस्थित होते. तसेच दिलीपराव पाटील, माजी अध्यक्ष करोडपती, सुभाष पाटील तसेच रोटरीचे डिस्ट्रिक्ट जॉइंट सेक्रेटरी नितीन अहिरराव, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, सहसचिव संजय बारी यांच्यासह एम. डब्ल्यू. पाटील, व्ही. एस. पाटील,  रमेश वाघजाळे, चंद्रकांत साखरे, रोटरी सदस्य, इतर जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने