केळी भावा बद्दल दोन जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.. रावेरला बऱ्हाणपूरसह जिल्ह्यातील कृऊबा संचालक मंडळ, शेतकरी व व्यापाऱ्यांची जम्बो बैठक संपन्न

 केळी भावा बद्दल दोन जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.. रावेरला बऱ्हाणपूरसह जिल्ह्यातील कृऊबा संचालक मंडळ, शेतकरी व व्यापाऱ्यांची जम्बो बैठक संपन्न


रावेर दि.३१(प्रतिनिधी):केळीच्या स्थिर भावाबद्दल जळगाव जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद व बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर येथे शेतकरी व व्यापारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींची बैठक आयोजित करण्यात आली होती.शेतकऱ्यांनी केळी भाव चढ उताराची तसेच काही व्यापारी  शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावर शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे  लायसन्स असेल अशाच व्यापाऱ्यांना केळी द्यावी तसेच फसवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या.

याप्रसंगी बऱ्हाणपूर येथील व्यापारी तसेच रावेर ,यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती , संचालक मंडळ तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.   या सभेनंतर संध्याकाळी चार वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील, बबलू कोळी, चोपडा बाजार समितीचे सभापती नरेंद्र  पाटील, संचालक भाऊसाहेब पाटील, गोपाळ पाटील यांनी बऱ्हाणपूर येथे जाऊन तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील होत असलेल्या केळी लिलावाची सविस्तर माहिती जाणून घेतली व लिलाव प्रक्रिया कशी होते यामध्ये सहभाग घेतला व सर्व माहिती संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून जाणून घेतली.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने