अडावद येथील सार्वजनिक विद्यालयातील मुलींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकलींचे वाटप

 अडावद येथील सार्वजनिक विद्यालयातील मुलींना  मानव विकास योजनेअंतर्गत  सायकलींचे  वाटप   

अडावद ता. चोपडा दि.३१(प्रतिनिधी) सार्वजनिक विद्यालयातील इयत्ता आठवीत असणाऱ्या गरीब मुलींना- मानव विकास योजने अंतर्गत शैक्षणीक वर्षे  २०२३-२४  साठीचे उपक्रमातून अडावद येथे  राजमाता , जिजाऊ   या योजनेतर्गत  विद्यालयातील एकूण २९ लाभार्थी  विद्यार्थीनींना  मोफत सायकलींचे वाटप  चोपड्याचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख , उपाध्यक्ष रतिलाल राजकुळे, संचालक  शांताराम कोळी,  हरिष पाटील सेवा निवृत्त मुख्याध्यापक, जी व्ही पाटील,मुख्याध्यापक, ए जे  कदम, चोपडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, व मुख्याध्यापक प्रविण पाटील  या मान्यवरांच्या हस्ते  वाटप करण्यात आले.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदकुमार देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, रतिलाल राजकुळे , शांताराम कोळी , हरिष पाटील, जी व्ही पाटील होते .

   शाळेचे  अध्यक्ष  नंदकुमार देशमुख  यांनी पाहुण्याचे स्वागत केले.  यावेळी मुख्याध्यापक ए जे कदम यांनी प्रास्तविकात  मुलीना  सायकल विषयी सविस्तर माहिती सांगितली  तसेच गट शिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी   विद्यार्थीनीना  व उपस्थित विद्यार्थ्याना  शिक्षण व्हावे म्हणून  शासनाच्या असलेल्या  विविध योजना संदर्भात माहिती दिली. तसेच आयुष्यात शिक्षणाला खुप महत्व असून   इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी  कॉपीमुक्त  वातावरणात  परीक्षा देण्यासाठी   सज्ज रहावे असे आवाहन केले.    या कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार सचीन पाटील यांनी मानले  कार्यक्रमच्या यशस्वीते साठी  पर्यवेक्षक एम ए बाविस्कर , उपशिक्षक एम जी पाटील , आर आर देशमुख , आर टी मोरे,  व्ही एच पानमन,  श्रीमती एस एम देशमुख , श्रीमती एन आर पाटील, एच आर कंखरे, एन सी महाजन , श्रीमती एस बी कोळी , पी व्ही पवार , तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  बंधु  भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने