निंभोरा,बाभूळगाव,सोनवद व दहिदुल्ले परिसरात अति पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान..

 

निंभोरा,बाभूळगाव,सोनवद व दहिदुल्ले परिसरात अति पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान..

धरणगाव दि.३१(प्रतिनिधी): तालुक्यातील,निंभोरा, बाभूळगाव सोनवद व दहिदुल्ले परिसरात जवळजवळ ३० दिवसांपासून सतत पाऊस सुरु असल्याने शेतातील पिकांचे  अतोनात नुकसान  झालेले आहे.   पाऊसाची रिपरिप मुळे सर्व  शेतातील कामे खोळंबली आहेत अती  पावसामुळे शेतातील पिकांची कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करता येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.मोठ्या प्रमाणावर तन शेतात   जोर धरू लागले आहेत. सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांची वाढ थांबली पिवळी पडली आहेत
याचा परिणाम उत्पन्नावर झालेला आहे परिणामी पिकांची वाढीव आता खुंटली आहे शेतकरी वर्ग अशा सतत धार सुरू असलेल्या पावसामुळे भयंकर अडचणीत आला आहे या शेत शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. एक महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतातील कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, मूंग, उडीद इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गा कडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने