पुणेच्या मातृमंदिर संस्थेतर्फे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांना अध्यापकोत्तम पुरस्कार..

 पुणेच्या मातृमंदिर संस्थेतर्फे  मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांना अध्यापकोत्तम पुरस्कार..

चोपडा दि.३१(प्रतिनिधी)महाराष्ट्र परिचित ज्ञानप्रबोधिनी पुणे च्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थे तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक विचारां शी बांधिलकी जोपासणाऱ्या १२५ विद्यालयांमधून दरवर्षी समर्पित भावनेने कार्यरत एका अध्यापकांस 'अध्यापकोत्तम ' पुरस्कार प्रदान केला जातो  .या वर्षी हा पुरस्कार नरेंद्र भावे ( मुख्याध्यापक व विश्वस्त विवेकानंद माध्यमिक विद्यालय ) यांना जाहीर झाला होता . त्यांना नुकतेच आ . योगेशबुवा रामदासी ( कार्यवाह :समर्थ सेवा मंडळ - सज्जनगड ) यांच्या शुभहस्ते ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रु.११हजारांसह भेटवस्तू, सन्मानपत्र  प्रदान करून अध्यापकोत्तम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

त्यांचे या पुरस्कारा निमित्त विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ . विकास हरताळकर, डॉ विजय पोतदार ( माजी अध्यक्ष ), उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड .रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विवेकानंद प्रतिष्ठान विविध शाखा प्रमुख अनुक्रमे मुख्याध्यापिका आशा चित्ते, प्रिसिंपल सुरेखा मिस्त्री, प्राचार्य प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने