चोपडा नगरपरिषद कार्यालयातील "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना मदत कक्षास आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांची सदिच्छा भेट

 चोपडा नगरपरिषद कार्यालयातील "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना मदत कक्षास आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांची सदिच्छा भेट 

चोपडा दि.२२(प्रतिनिधी) :राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्याआरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली आहे. त्याअनुषंगाने सदर योजनेसाठी चोपड़ा नगरपरिषद कार्यालयामार्फत १)चोपड़ा नगरपरिषद कार्यालय, २) नगरपरिषद रुणालय, चोपडा, ३) डॉ.ए.पी.जे. कलाम कम्यूनिटी हॉल, चोपडा ४) भगवान बौध्द विहार, समता नगर विहार, चोपड़ा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मदत कक्षांची स्थापना करणेत आलेली आहे. आज रोजी त्यापैकी चोपड़ा नगरपरिषद कार्यालयात स्थापन करणेत आलेल्या मदत कक्षास चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार सौ.लताताई  चंद्रकांत सोनवणे यांनी सदिच्छा भेट दिली. सदर भेटी दरम्यान आमदार महोदयांनी नागरीकांशी साधून प्रशासनास योग्य त्या सुचना देवून चोपडा नगरपालिका कार्यालयाच्या मदत कक्षा संदर्भात समाधान व्यक्त केले

चोपड़ा शहरातील सर्व पात्र महिला आपल्या जवळच्या वरील ४मदत कक्षापैकी कोणात्याही एका मदत कक्षास भेट देवून आपला अर्ज भरु शकतात तसेच शहरातील सर्व पात्र महिलांनी विहित मुदतीत अर्ज भरावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री राहुल पाटील यांनी केले.सदर भेटी दरम्यान  आमदार सौ. लतालाई सोनवणे यांच्या समवेत तहसिलदार  श्री. भाऊसाहेब थोरात,  मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील,  उपमुख्याधिकारी श्री. संजय मिसर तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने