माजी नगराध्यक्ष अॕड.संदीप भैय्या पाटील यांची शहरातील विविध समस्यांवर तहसीलदारांशी चर्चा

 

माजी नगराध्यक्ष अॕड.संदीप भैय्या पाटील यांची शहरातील विविध समस्यांवर तहसीलदारांशी चर्चा

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)चोपडा नगरीचे माजी नगराध्यक्ष , जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैयासाहेब ऍड. श्री संदीप सुरेश पाटील यांनी आज 22जुलै 2024 रोजी  काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या विविध समस्यांच्या निराकारणासाठी तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली.
तहसीलदार  श्री भाऊसाहेब थोरात यांनी उचित स्वागत करून समस्या जाणून घेतल्या.विशेषतः मतदार यादीत कमी झालेली नावे पुन्हा यादीत घेणे,मतदार यादी अद्यायावत करणे, मतदारकेंद्रे मतदारांना जवळ राहतील याची काळजी घेणे,संजयगांधी योजनेतील पात्र लोकांना त्वरित लाभ मिळणेसाठी लक्ष घालणे,नुकसानग्रस्त शेती पिकांचे  त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करणे आदी समस्या चर्चा करून लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के. डी.  चौधरी सर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजीव सोनवणे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समीतेचे संचालक प्रा.नंदकिशोर सांगोरे ,अल्पसंख्यांक विभागाचे ज्येष्ठ नेते शेख आरिफ,काँग्रेसचे कार्यकर्ते देवकांत के. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने