जळगांव येथून तिरुपती, इंदौर व अहमदाबाद विमानसेवा लवकरच सुरू होणार ..केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांना नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडूंचे आश्वासन

 जळगांव येथून तिरुपती, इंदौर व अहमदाबाद विमानसेवा लवकरच सुरू होणार  ..केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  ह्यांना नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडूंचे आश्वासन 

♦️मुंबई व पुणे विमानसेवेची प्रवाश्यांच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ वेळ करण्याचीही मागणी 

नवी दिल्ली,दि.२९(प्रतिनिधी): येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापू यांची भेट घेऊन, जळगांव विमानतळ येथून लवकरात लवकर “तिरुपती, इंदौर व अहमदाबाद” साठी विमानसेवा चालू करणे बाबत मागणी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मागणी करतांना असे सांगितले की, जळगांव विमानतळ येथे आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लँण्डींगअश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण असून, जळगांव विमानतळ येथून सध्या स्थितीत मुंबई व पुणे साठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु आहे. परंतु येथून प्रवास करणारे व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुणे साठी संध्याकाळी व मुंबई साठी सकाळी दररोज विमानसेवा चालू करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी लावून धरली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केलेल्या मागणीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापू यांनी सकारात्मक पणे घेऊन लवकरच केलेल्या दोन्ही मागणीवर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने