संभाजीनगरचे दोघे शस्त्रासह पोलिस तावडीत..५ गावठी पिस्तूलासह १०जिवंत काडतुसे व कोयता जप्त

 

संभाजीनगरचे दोघे शस्त्रासह पोलिस तावडीत..५ गावठी पिस्तूलासह १०जिवंत काडतुसे व कोयता जप्त


चोपडा दि.२९(प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर-सत्रासेन रस्त्यावर गुप्त माहितीच्या अधिकारावर ग्रामिण पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना ५ गावठी पिस्तूल,१० जिवंत काडतुसे ,धारदार कोयता व मोटारसायकलसह २लाखांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
ग्रामिण पोलिस स्टेशनचे पो.नि कावेरी कमलाकर ह्यांना  मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी सापळा रचून दि. २८रोजी संध्याकाळी ७:३० वाजता लासुर गावचे हद्यीत सत्रासन जाणारे रोडवर येणार जाणारे वाहन थांबवुन त्यांची तपासणी करीत असताना  एका निळ्या रंगाची मोटार सायकलवरील दोन इसमांची झाडाझडती घेतली असता  त्यांच्याकडे पाच गावठी कट्टे व १० जिवंत काडतुसे आणि धारदार कोयता मिळून आला. मोटार सायकल चालक (छ. संभाजी नगर)  व मागे  बसलेला इरफानखान अयुबखान वय २३ रा. नाकसीन कॉलनी जिन्सी पोलीस स्टेशन जवळ, ता.जि. औरंगाबाद, (छ. संभाजी नगर) यांना  मुद्देमालासह ताब्यात घेतले असता  कसून केलेल्या चौकशीत सदरचे कट्टे हे कोणाकडुन व कितीलाआणले आहेत  तेव्हा त्यांनी सदरचे कट्टे हे प्रत्येकी २५,०००/- रुपयाला पारउमर्टि येथुन आणले असून १ राऊंड (काडतुस) हे प्रत्येकी १,०००/- रुपयाला सुजितसिंग बर्नाला रा. मध्यप्रदेश याचे कडुन घेतले असल्याचे  कबुली दिली आहे.
याबाबत पो कॉ रावसाहेब एकनाथ पाटील यांचा फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम वय २४ वर्षे, रा. नारेगांव गल्ली नंबर ४ मानीनगर ता.जि. औरंगाबाद, इरफानखान अयुबखान वय २३ रा. नाकसीन कॉलनी जिन्सी पोलीस स्टेशन जवळ, जिल्हा औरंगाबाद, (छ. संभाजी नगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.तसेच २ लाख ०६,९४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सापळा यशस्वीतेसाठी पो.ना. शशिकांत पारधी पो. को. राहुल रणधीर, पो.का. दिपक शिंदे, अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने