मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती कार्यकर्ते रेंदाळ गावी फॉर्म भरण्याचे काम करतायं घरोघरी

 

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती कार्यकर्ते रेंदाळ गावी  फॉर्म भरण्याचे काम करतायं घरोघरी

कोल्हापूर दि.३०(प्रतिनिधी)मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  समितीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष  श्री अविनाश बनगे  यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपतालुकाप्रमुख  श्री महेश माळी ठाकरे व शिवसेना शहर प्रमुख  श्री शरद पाटील आणि कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष धनंजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रेंदाळ मध्ये योजनेची माहिती व ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म भरून देण्याचे कार्य  जोमाने सुरू आहे.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून आज रोजी रेंदाळ गावी  घरोघरी जाऊन योजनेचा फॉर्म भरण्याची मोहीम सुरू आहे .यावेळी शिवाजी कोळी,  प्रशांत मिठारी,  गुरु कोळी, प्रविण कोळी,  प्रज्वल सुतार ,आशिष कोळी,धनराज पिसे,सामाजिक कार्यकर्ते श्री किरण वाळके व शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने