"ई पॉस मशिन" सर्व्हर प्राब्लेममुळे रेशन दुकानदार व कार्ड धारक हैराण.. अडचण दूर न झाल्यास मशिन करणार तहसीलला जमा

 "ई पॉस मशिन" सर्व्हर प्राब्लेममुळे रेशन दुकानदार व कार्ड धारक हैराण.. अडचण दूर न झाल्यास मशिन करणार तहसीलला जमा 

चोपडा दि.३०(प्रतिनिधी) वारंवार येत असलेल्या इ पॉस च्या  सर्व्हर  प्राब्लेमला रेशनकार्ड धारक जाम  कंटाळले असुन दुकानदारही हैराण झाले आहेत. वरीष्ठ पातळीवर कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने चोपड्याचे पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर यांना ई पॉस मशिन सर्वरची समस्या न सुटल्यास 5 ऑगस्ट ला तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार ई पॉस मशिन तहसिलला जमा करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यात साधारण 52 हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर सन 2018 पासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. परंतु मागील दोन महिन्यापासून ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्वर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आणि मोल-मजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत राहावे लागते. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असून देखील धान्य वितरण करू शकत नाहीत. याबाबत तालुका स्तरापासून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर अनेक वेळा तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाययोजना न झाल्यामुळे पुढील काळात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आपापल्या तहसील कार्यालयात ई-पॉस मशीन जमा करतील असा निर्णय घेण्यात आला असून, दिनांक 25 जुलै, 2024 रोजी मा. प्रधान सचिव, साहेब यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही समाधानकारक तोडगा व निश्चित आश्वासन न निघाल्याने महासंघाला अत्यंत नाईलाजाने हा निर्णय घेणे भाग पडत आहे. दिनांक 31 जुलै, 2024 पर्यंत शासनाकडून या ई-पॉस मशीनच्या संदर्भात ठोस निर्णय तसेच आवश्यक उपाययोजना न झाल्यास राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार जुलै महिन्याचे धान्य वितरण बंद झाल्यानंतर दिनांक 05 ऑगस्ट, 2024 रोजी आपल्या ई-पॉस मशीन आपापल्या तहसील कार्यालयात जमा करतील, याबाबत आपण नोंद घ्यावी आणि धान्य वितरणामध्ये येणाऱ्या तांत्रिक समस्यांची सोडवणूक करावी, ही  विनंती. करण्यात आली आहे.

 यावेळी गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे ,संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या सह संघटनेचे उपाध्यक्ष मधूकर राजपूत तसेच कांतीलाल चौधरी, प्रकाश राजपूत,बुधा बारेला, अशोक चौधरी,ए‌.टी‌.जैन,रूपेश कोष्टी, सरफराज तडवी  यांच्या सह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने