शेखपुरा भागात विजेचा लपंडाव .. त्रस्त रहिवाशांनी गाठले कार्यालय

 

शेखपुरा भागात विजेचा लपंडाव .. त्रस्त रहिवाशांनी गाठले कार्यालय

चोपडा दि.३०(प्रतिनिधी: शहरातील शेखपुरा भागात आज,दि.३०जुलै२०२४ रोजी  विद्युत डि.पीत बिघाड झाल्याने सकाळी 7:00 वाजेपासून लाईट नसल्याने   लहान मुले,तसेच वयोवृद्ध पुरूष व महीलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत  असल्याने संतापलेल्या रहिवास्यांनी एमएसईबी  कार्यालयात धाव घेऊन निवेदन देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.दरदिवशी या भागात विजेचा लपंडाव सुरू असतो तो बंद करावा अशी मागणी एम.एस.सी.बी.आफीसचे   मुख्य अभियंता पारधी तसेच सहाय्यक अभियंता गायकवाड यांच्याकडे केली आहे.

यावेळी शेखपुरा भागातील हाफीज अली सैय्यद, मजहर सैय्यद, ईसाहक मौलाना, जुबेर मौलाना, आकीब अली सैय्यद, बाबा सैय्यद, जबा मिस्तरी, वहाब जनाब ,हारीष सर,गुलाब, ईकराम सैय्यद, मुजाहिद पठाण,अमार सैय्यद ,आशिक वायरमेन,भुरऱ्या सैयद,सलीम भाई मिजवान,सर्व शेखपुराभागातील रहिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने