निळे निशाण संघटनेमार्फत भर पावसात आंदोलन.. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी


निळे निशाण संघटनेमार्फत भर पावसात आंदोलन.. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी
   

चोपडा दि.१६(प्रतिनिधी):निळे निशाण संघटनेमार्फत  उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा वाढणारा हलगर्जीपणाच्या निषेधार्थ 15 जुलै रोजी भर पावसात जोरदार आंदोलन करण्यात आले. काही दिवसापासून रुग्णांना झालेल्या त्रासाबद्दल दोशी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली. वैदकिय अधिक्षक  उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांना निवेदन देण्यात आले.
         जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी   भ्रमणध्वनीद्वारे कार्यकर्त्यांनी संपर्क साधून दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास पुन्हा 19 जुलै रोजी  संघटनेमार्फत जोरदार आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला . भर पावसात रुग्णालयासमोर आंदोलनकर्ते ओले चिंब होत असल्याने पाहून बघ्यांची गर्दी उसळली होती.या आंदोलनात अनिताताई बाविस्कर , बबिता बाविस्कर , अनिता वार्डे , शुभम शिदे , विकास सोनवणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने