पंकज नगर परिसरात लाडकी बहिण योजनेसाठी स्वतंत्र कॅम्प.. सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या जनसेवी कार्याने महिला वर्गाला दिलासा

 पंकज नगर परिसरात लाडकी बहिण योजनेसाठी स्वतंत्र कॅम्प.. सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या जनसेवी कार्याने महिला वर्गाला दिलासा

चोपडा दि.१६(प्रतिनिधी) : चोपडा शहरात" मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण " योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रचंड गर्दी उसळल्याने  तारांबळ उडत आहे महिलांची फरफट लक्षात घेऊन  तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी पुढे येत पंकज नगर परिसरातील माता बघिनींसाठी  दिनांक 16/07/24 रोजी  स्वतंत्र कॅम्प आयोजित करून महिला वर्गाला आपल्याच परिसरात सेवा उपलब्ध करून दिल्याने मोठ्ठा दिलासा मिळाला आहे.

या कॅम्पमध्ये लाडकी बहीण योजना, ई श्रम कार्ड, आयुष्मान भारत आणि इतर योजनांचे फॉर्म भरणे सुरु केले आहे शहराच्या मध्यवर्ती भागात जास्त गर्दी उसळली असल्याने आपल्या रहिवासी भागातील म्हणजे फक्त  पंकज नगर परिसरातील सर्व कॉलन्यांमधील  माता बधिनिंसाठी फॉर्म भरणे सुरू केले आहे तरी गरजूंनी या सेवेचा लाभ घेणेसाठी   किरण स्टेशनरी अँड झेरॉक्स,पंकज शाळे समोर,चोपडा राहुल पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी क्र-8806612013/8805566266 यांवर संपर्क साधावयाचा आहे.
सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी या अगोदरही  भरपूर कॅम्प लावलेले आहेत आणि  कॉलनी परिसरातील  रहिवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे  रुग्ण असो कुणी गरजू आतापर्यंत तीस ते पस्तीस वेळेस रक्तदान केले आहे .कोरोना काळात लसीकरण कॅम्प, कोरोना काळात टेस्टिंग कॅम्प, लहान बाळांच्या लसीकरणाचे कॅम्प,आदि सेवा देऊन जनसेवा बजावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर  रहिवाशांकडून नेहमीच अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने