जवाहर नवोदय वि‌द्यालय प्रवेश फॉर्म भरण्यासाठी 7 ऑक्टोंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ

 

जवाहर नवोदय वि‌द्यालय प्रवेश फॉर्म भरण्यासाठी  7 ऑक्टोंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ

चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जवाहर नवोदय वि‌द्यालयातील इयता 6 वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात जुलै 2024 पासून झालेली आहे. प्रवेश परिक्षा अर्ज  पूर्वी प्रमाणे फक्त ऑनलाइन पद्‌धतीनेच भरायचे आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढविण्यात आलीअसून ती 07/10/2024  रोजी पर्यंत करण्यात आली आहे.23 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती त्यात पुन्हा बदल करण्यात आला असून 7 ऑक्टोंबर 24 पर्यंत वाढ देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला आहे.  पुनः सुधारणा करण्याची आवश्यकता वाटल्यास पुन्हा बदल केला जाऊ शकतो अशी माहिती प्राचार्य आर.आर.खंडारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे
ही परीक्षा  ठरलेल्या वेळेवर म्हणजे दिनांक 18/01/2025 (शनिवार) रोजी निर्धारित केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर वेळ 11.30 से 1.30 वाजेपर्यंत होईल, सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहे. सर्व संबंधितांनी माहिती पक्क काळजीपूर्वक वाचून चालू वर्षी इयत्ता ५ वी त शिकत असलेल्या सर्व वि‌द्यार्थी (अटी पूर्ण करणारे) ह्या प्रवेश परीक्षेस ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. सदर माहिती जिल्हयातील सर्व इयता पाचवीमध्ये शिकत असलेले वि‌द्यार्थी व संबंधीत पालक शिक्षक, मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांनी आपल्या मार्फत अवगत करावी असे आवाहन वि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री बलराम दुद्धिवेदी 9422797110 श्री. हर्षद पवार 9921297951 तसेच  रामकुमार वर्मा संगणक शिक्षक 8720062152 यांच्याशी संपर्क साधावा.तसेच करेक्शन विंडो पंजीकृत वि‌द्यार्थ्यांसाठी दिनांक 08/10/2024 आणि 09/10/2024 ला खुली राहील ज्यामध्ये लिंग (मुलगा/मुलगी) प्रवर्ग (सामान्य, इतर मागास अनुसू‌चित जाती, अनुसूचित जमाती) क्षेत्र (ग्रामीण शहरी) दिव्यंगता परीक्षा माध्यम विद्यार्थ्यांचा समावेश आहे  असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने