समाजकार्य महाविद्यालयात "पोषण आहाराचे महत्त्व" या विषयावरील व्याख्यान संपन्न

समाजकार्य महाविद्यालयात "पोषण आहाराचे महत्त्व" या विषयावरील व्याख्यान संपन्न


चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी)आज दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्ताने "पोषण आहाराचे मह्त्व" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे करण्यात आले होते. 

        सदर कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना मधील विद्यार्थिनींनी एन. एस. एस. गीत सादर केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी आजच्या राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. आजच्या काळातील राष्ट्रीय सेवा योजनेचे मह्त्व त्यांनी सांगितले. तसेच एन. एस. एसच्या घोषणाही विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. भविष्यामध्ये चांगले स्वयंसेवक बनून समाजासाठी कार्य करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

यानंतर प्रा. डॉ. मोहिनी उपासनी यांनी आजच्या एन. एस. एस. स्थापना दिवस निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी NOT ME BUT YOU याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. आपण आपले व्यक्तिमत्व घडवित असताना समाजातील प्रश्न समजून घेऊन, व्यक्ति आणि समाज यांना मदत करणेही आवश्यक आहे. आपण कोण आहोत, आपले ध्येय कोणते असले पाहिजे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

       आपण सक्षम युवक आणि युवती बनण्यासाठी आपले आरोग्य तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार तितकाच महत्वाचा आहे. पोषण आहारामध्ये आपण आपल्या भारताचा जो राष्ट्रध्वज  तिरंगा आहे. त्यामधील केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगांनुसार आपण आपला आहार घेतला पाहिजे. याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यामधे गुळ, शेंगदाणे, भात, पोहे, हिरव्या सर्व पालेभाज्या यांचा समावेश आपल्या आहारात आपण कसा केला पाहिजे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संबोधी देशपांडे (कार्यक्रम अधिकारी)  यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. 

        सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने