जातवार गणना झालीच पाहिजे यासाठी 18 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा चोपडा जळगाव येथे मोर्चा

 जातवार गणना झालीच पाहिजे यासाठी 18 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा चोपडा जळगाव येथे मोर्चा   

चोपडा ,दि१६(प्रतिनिधी) येथे आयटक कार्यालयात ज्येष्ठ नेते काँ शांताराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीला पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले  ते म्हणाले की  भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विजयवाडा महा अधिवेशनाने देशात जातवार गणना करावी म्हणून हाक दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही आंदोलन केले जाणार आहे. त्यात चोपडा येथे सकाळी दहा वाजता मोर्चा व जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दुपारी12 ते 3 वाजता दरम्यान धरणे निदर्शने करण्यात येणार आहेत.

याबाबत सविस्तर , प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, भारतात 2011 ची जनगणना नंतर 2021 ची जनगणना व्हावयास पाहिजे होती. परंतु मोदी सरकारने ती  केली नाही  आता ओबीसी विरुद्ध जरांगे यांचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जातवार जनगणना झालीच पाहिजे म्हणून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले 

 या आंदोलनात महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धरतीवर *लाडकी बहीण योजना* अमलात आणली आहे. पूर्वी महाराष्ट्राचा आदर्श देशातील राज्य घेत आणि आता दुसरा राजांच्या आदर्श घ्यावा लागत आहे  या योजनेच्या लाभासाठी कागदपत्र जमवणे कठीण जात आहे. महिलांचे मजुरी कमावण्याचे  दिवस बुडत आहेत. उत्पन्नाचा दाखला काढून टाकला हे जरी योग्य असले तर फक्त आधार कार्ड आणि बँकेचे अकाउंट नंबर एवढेच कागद पुढे घ्यावेत आणि अर्ज हे ऑफलाइनने स्वीकारावेत. म्हणजे वेळ जाणार नाही ऑनलाईन ला अडचणी येत आहेत हे देखील मागणी या आंदोलनात मांडण्यात येणार असून, जिओ व इतर कंपन्यांचे नुकतेच वाढविलेले रिचार्ज दर कमी करा गॅस दरवाढ कमी करा म्हनजेच महागाई विरोधात..आवाज उठवला जाणार आहे त्याचप्रमाणे सरकारने मोफत तीर्थयात्रा योजना ही सुरू करून या योजनेअंतर्गत जाणाऱ्या लाभार्थीना दोन हजार रुपयाची मदत द्यावी.तसेच सरकारी गावठाणावर रहिवासी अधिक रहिवासी घर जागा नावे करा 5 लाख रुपये घरकुल योजनेचे अनुदान द्यावे .गायरान जमिनी  कसणारेंचे नावे करण्यात यावे .श्रावणबाळ व इतर योजनांची रखडलेली मानधन अदा करण्यात यावे या मागण्याही तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडण्यात येणार आहे.

 तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी असे आवाहन भाकप जिल्हा प्रभारी सचिव कॉ ज्ञानेश्वर पाटील वासुदेव कोळी कॉम्रेड लक्ष्मण शिंदे कॉम्रेड भास्कर सपकाळे निर्मला शिंदे कॉम्रेड वासुदेव कोळी छोटू पाटील   सादीक शेख सरफराज शहा  गुलाब शहा राधाबाई पाटील जेबाबी शेख सुमनबाई माळी. जिजाबाई राणे शशिकला निंबाळकर आदींनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने