घाडवेल येथे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रखुमाई दर्शन सोहळा

 घाडवेल येथे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रखुमाई दर्शन सोहळा


चोपडा दि.१३(प्रतिनिधी)तालुक्यातील घाडवेल येथे श्री पांडूरंगरचा कृपेने, श्री श्री १००८ महामण्डेलेश्वर प.पु. संत श्री बालयोगीजी महाराज व गुरुवर्य मोठे बाबा या साधु संतांच्या आशीर्वादाने आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाई दर्शन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे 

 कार्यक्रम दि. १७/७/२०२४  बुधवार रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर श्री क्षेत्र घाडवेल ता. चोपडा येथे होत आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ व श्री विठ्ठल रखुमाई समितीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने