शिवसेनेच्या शिंदखेडा तालुका उपप्रमुखपदी रावसाहेब सैंदाणे यांची निवड


शिवसेनेच्या शिंदखेडा तालुका उपप्रमुखपदी रावसाहेब सैंदाणे यांची निवड

शिंदखेडा दि.१३(प्रतिनिधी)हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख  कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार धारेवर विश्वास ठेवत, पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, आणि खा.संजय राऊत  यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेनेच्या शिंदखेडा  उपतालुका प्रमुखपदी अक्कडसे येथील लोकनियुक्त सरपंच व प्रगतीशील शेतकरी रावसाहेब गोपीचंद सैंदाणे यांची निवड करण्यात आली आहे.
रावसाहेब सैंदाणे यांचे उत्तम संघटन कौशल्य,  पक्ष निष्ठा व कार्यकर्ते जोडण्याची हातोटी पाहून पक्षाने ही निवड केली आहे.तश्या आशयाचे पत्रक
दि १२जुलै २०२४ शुक्रवार रोजी काकाजी मंगल कार्यालय, शिंदखेडा येथे  श्री रवींद्रजी मिर्लेकर (उपनेते) यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तथा धुळे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. अशोकजी धात्रक, उपनेत्या सौ शुभांगीताई पाटिल, सहसंपर्क प्रमुख श्री हिलालअण्णा माळी, जिल्हाप्रमुख श्री, हेमंत साळुंखे, शिरपूर विधानसभा संपर्कप्रमुख श्री. रविंद्र धनावडे, शिंदखेडा श्री. पवार  यांच्या उपस्थितीत धुळे ग्रामीण पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात  देण्यात आले.
या निवडीबद्दल रावसाहेब सैंदाणे   यांचेवर  शिंदखेडा  व शिरपुर तालुका विधानसभेतील पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच हितचिंतकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने