कोळी जमातीच्या ठिय्या आंदोलनाचे फलित.. प्रांताधिकार्यांनी दिले ५१ दाखले..आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.

 कोळी जमातीच्या ठिय्या आंदोलनाचे फलित.. प्रांताधिकार्यांनी दिले ५१ दाखले..आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.

अमळनेर/चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी कोळीबांधवांतर्फे अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या नेतृत्वात दि.१५ जुलै रोजी प्रांत कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा काढून त्याचठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यादरम्यान प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी आंदोलनकर्त्यांसोबत वेळोवेळी चर्चा करून ठिय्या आंदोलनाच्या १२ व्या दिवशी टोकरेकोळीचे ५१ दाखले देण्यात आलेत. यापुढेही सबळ पुरावे जोडलेल्या प्रकरणांना दाखले देण्यात येतील, असेही त्यांनी  सांगितले. ह्या मोर्चा व आंदोलनात हज्जारों कोळीबांधवांनी सहभाग घेतला. याप्रसंगी आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने कोळी जमातीत आनंदाचे वातावरण झाले आहे.

        यासाठी अमळनेरचे कोळी पंच मंडळाचे अध्यक्ष मधुकरगुरु सोनवणे, प्रविण सुर्यवंशी मुंबई, अजय बाविस्कर जळगाव, प्रवर्तन संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाटे ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. आंदोलन यशस्वीतेसाठी चंद्रशेखर सुर्यवंशी, हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, सुकदेव सोनवणे, सागर सोनवणे, भिमराव बाविस्कर, सुभाष रायसिंग, उखा कोळी, गजानन कोळी, सागर सपकाळे, रावसाहेब शिरसाठ, शांताराम कोळी, भुषण कोळी, योगेश कोळी, वसंत महाराज, भिकनराव कोळी, गोविंदा कोळी, मनोज कोळी, राजेंद्र लोहारे यांनी  विशेष प्रयत्न केलेत. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. समारोप प्रसंगी जळगाव येथील सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते. शेवटी आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर व मधुकरगुरु सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानलेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने